ट्रकमालक, चालकांना नेहमी सहकार्य करण्यासाठी तत्पर राहणार

0

शिरपूर। तालुका ट्रक – मालक युनियनतर्फे फलक अनावरण, दिनदर्शिका व कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिरपूर-शिरपूर ट्रक मालक व चालकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी सहकार्य करण्यासाठी तत्पर राहणार. ट्रक मालक युनियनच्या विविध मागण्यांसाठी आमचा पाठींबा राहील. ट्रक मालक युनियनने विविध विधायक कामांमध्ये देखील आपले योगदान द्यावे असे आवाहन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले. ते शिरपूर तालुका ट्रक-मालक युनियनतर्फे सी.आर.पेट्रोलपंप, शिरपूर फाटा येथे फलक अनावरण, दिनदर्शिका व कार्यालय उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.

यांची होती उपस्थिती
शिरपूर तालुका ट्रक-मालक युनियनच्या फलकाचे उद्घाटन आ.काशिराम पावरा यांच्या हस्ते तसेच कार्यालयाचे उद्घाटन प्रियदर्शिनी सहकारी सूत गरणीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, आशिष पाटील, नाशिक टाटाचे रुबलदास, पोलिस उपविभागीय अधिकारी आर. वाय. शेख, पो.नि. अनिल वडनेरे, ए.पी.आय. विनोद पाटील, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, सी.आर.पेट्रोल पंपचे संचालक भुपेंद्रभाई पटेल, आर.टी.ओ. राऊत, पंढरीनाथ माळी, देविदास पाटील, वालचंद पाटील, राजेंद्र देवरे, राजेंद्र अग्रवाल, नितीन गिरासे, हर्षल गिरासे, रणजितसिंग देशमुख, रत्नदिप सिसोदिया, शामकांतईशी, वासुदेव देवरे,विविध संस्थांचे पदाधिकारी, ट्रान्स्पोर्टचेमालक, मंजूर शेख इब्राहीम, रवि पंजाबी, भिका महाजन, रमेश कापडे, अरुण वाघ, राकेश पाटील, विजय टाटीया, नागरीक उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी किशोर राजपूत, मनिष पंजाबी, राजेंद्र पाटील, इर्फान मिर्झा, नरेश पवार, अरुण वाघ, सुरेश गवळे, प्रभाकर पाटील, संजय जैन, ज्ञानेश्वर महाजन, कवरलाल जैन, चंद्रकांत पाटील, जावेद शेख, भिकेसिंग राजपूत, प्रविण पाटील, बंटी पवार, मसुद मिर्झा, पप्पू माळी, सर्व पदाधिकारी यांनी कामकाज पाहिले. प्रास्ताविक नरेश पवार यांनी केले. सूत्रसंचलन राजेंद्र जाधव यांनी केले. आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.