नवापूर । सुरत धुळे महामार्गावर जिंदल पेट्रोल पंम्पाजवळ गुजरात उच्छल तालुक्यातील जामकी गावाचे रहिवासी बाळू शांता गावीत आपला मुलगा आणि गावातील तरुणीला घेऊन नवापूर येथे उपचारासाठी दवाखान्यात येत होते. दरम्यान, जिंदल पेट्रोलपंपाजवळ मागून येत असलेल्या ट्रक क्र एमपी 36 3515 ने गावीत यांच्या मोटर सायकलीला (मोटारसायकल क्र. जीजे 26 पी 1700) ला धडक दिल्याने मागे बसलेली आजारी असलेली तरुणी हिना रमेश गावीत (वय 17) रस्त्यावर पडली. यावेळी हिना गावीत धडक देणार्या ट्रकच्या चाका खाली येऊन जागीच ठार झाली. सोबत असलेल्या जयेश बाळा गामीत यास जखमी अवस्थेत 108 रुग्णवाहिकेत उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळीच पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. चालक गाडी घेऊन फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे.