धुळे – नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून टमाटे भरून धुळ्याकडे येणार्या ट्रकला पिकअप व्हॅनने मागावून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात
एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर अन्य दोन जखमी झाले. यासंदर्भात अधिक वृत्त असे की, आज सकाळी 3 वाजता मालवाहतुक करणार्या ट्रकने ब्रेक मारला. यावेळी रस्त्यावर धुके असल्यामुळे अचानक गती कमी झालेल्या ट्रकला मागून बोलेरो वाहनाने धडक दिली. या अपघातात (एम.एच.15 डि.के. 1014) बोलेरो पिकअपचा चालक रविंद्र साहेबराव आहिरे (वय-30) वर्षांचा तरूण जागीच ठार झाला. यावेळी ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी
घटनास्थळावर जावून पंचनामा केला. पुढील तपास चाळीसगावरोड पोलीस करीत आहेत.