ट्रकवर दुचाकी धडकल्याने युवक ठार

0

दोंडाईचाजवळ अपघात ; बाम्हणे गावावर शोककळा

दोंडाईचा – भरधाव दुचाकीस्वार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात बाम्हणे येथील कांचेश्‍वर नारायण पाटील (35) हे जागीच ठार झाले. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोंडाईचा-बाम्हणे रस्त्यावरील केशरानंद जिनिंगजवळ हा अपघात झाला. सुत्रांच्या माहितीनुसार बोरींग करणारा ट्रक रस्त्यावर बेशिस्तपणे उभा असतांना पाठीमागून आलेला दुचाकीस्वार त्यावर धडकल्याने जागीच ठार झाला. बाम्हणे गावातील रहिवासी असलेल्या कांचेश्‍वर यांच्या मृत्युने गावात शोककळा पसरली. त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन लहान मुले असा परीवार आहे. रात्री उशिरा दोंडाईचा परीसरात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.