जळगाव। ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने भरधाव बस ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी सिल्लोडपासुन पुढे काही अंतरावर घडली. प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यात सहभाग घेतला. आठ जखमींना रूग्णवाहिकेतून येथील जिल्हा शासकिय रूग्णालयातहलविण्यात आले.
औरंगाबादकडून जळगावकडे येत होती बस
औरंगाबाद येथुन जळगावकडे निघालेली बस सिल्लोड बसस्थानकावर आली. काही सिट घेतल्यानंतर बस जळगावकडे मार्गस्थ झाली. महामार्गावर ट्रकच्या पुढे अन्य वाहनाचा अडथळा निर्माण झाल्याने ट्रक चालकाने त्याने अर्जन्ट ब्रेक लावून वाहन थांबविले. ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने मागे येत असलेली बस ट्रकवर आदळून अपघातझाला. आज सकाळी साडेसात वाजता घडलेल्या या अपघातात बसमधील जखमीना तत्काळ जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. जखमींमध्ये शेख मोहम्मद अझर मोहम्मद अली (वय-32) औरंगाबाद, इरफान रईसखान(वय-35) औरंगाबाद, प्राजंल जयंत भागवत (वय-22) मेघा जयंत भागवत (वय-42) दोन्ही रा.रावेर, मोहम्मद शाहरूख हक (वय-52) पूर्णीया (बिहार) , राजेंद्र नारायण बिडके(42) बोदवड, प्रल्हाद भिका घोडके (वय-71) भारूडखेडा (जामनेर), शेख रूसल सालिमभाई (वय-42) भावनगर (गुजरात) यांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थीर असुन किरकोळ जखमींवर उपचार करुन त्यांना तातडीने रवाना करण्यात आले.