खेडीनजीक पेट्रोलपंपाजवळील घटना ; मारहाणीमुळे नियंत्रण सुटून ट्रक नाल्यात उलटला
जळगाव : खामगाव येथे स्टाईलचा माल उतरावून परतत असताना ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून तिन जणांनी चालकासह क्लिनरला बेदम मारहाण करुन लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्री खेडीनजीक पेट्रोलपंपाजवळ घडली. मारहाणीमुळे जखमी स्थितीत ट्रकचालवित असतानाच हा ट्रक हॉटेल गौरवनजीक नाल्यात उलटल्याचाही धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. क्लिनर रामदास ओंकार भील (41) व चालक रायरतन सुरेश शिरसाठ (दोन्ही रा.हातेड, ता.चोपडा) अशी हल्ला झालेल्या जखमींची नावे असून दोघांची प्रकृती चिंतानजक असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
ट्रक नाल्यात कोसळला
दोघं जण ट्रकच्या कॅबीनमध्ये घुसले. त्यांनी चालक व क्लिनर या दोघांना काहीही न बोलता थेट मारहाण करायला सुरुवात केली. काही त्यानंतर तिन्ही जण दुचाकीने पसार झाले. जबर मार लागल्यामुुळे रामदास व रायरतन या दोघांनी ट्रक तसाच पुढे चालवत आणला. काही अंतरावर गौरव हॉटेलजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट नाल्यात कोसळला. हा प्रकार पाहून रस्त्यावरुन येणाजया जाणार्या लोकांनी थांबून दोघांना बाहेर काढले. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही गंभीर जखमी झाल्याने बेशुध्दावस्थेत असल्याने नेमका काय एैवज लुटला हे स्पष्ट झालेले नाही. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निलेश भावसार हे जखमींचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात गेले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने ते जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याचा दरम्यान त्यांच्याकडे खामगावला स्टाईलचा माल उतरविल्याचे 40 ते 50 हजार रुपयांचे पेमेंट असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींचाही जबाब नसल्याने या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला नाही.