जळगाव । गुजरात राज्यातील भरुच येथील विलायत इंडस्ट्रीज मधुन नागपुरच्या भागीरथ टेक्सटाईल लिमिटेड कंपनीला जाणारा 25 लाख 15 हजार 378 रुपयांचा व्हिस्कोस स्टेपल फायबर हा माल जळगावी आल्यानंतर ट्रकसह गायब झाला होता. औद्योगीक वसाहत पोलिसनी गुन्ह्याचा छडा लागला असून 1 चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याची कसुन चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
भरुच(गुजरात) येथील विलायत इंडस्ट्रीज मधुन नागपुरच्या भागीरथ टेक्सटाईल लिमिटेड कंपनीला जाणारा 28 लाख 15 हजार 378 रुपयांचा माल व दहा लाखांचा ट्रक असा एकुण पस्तीस लाख रुपयांच्या जवळपास डल्ला चोरट्यांनी मारला होता. मात्र गुन्हेशोध पथकातील अश्रफ शेख या कर्मचार्यांच्या चाणाक्ष वृत्ती आणि कुतूहलातून गुन्हा उघडकीस आला आहे. चोरीची खात्री झाल्यावर पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकातील उपनिरीक्षक रोहन खंडागळे, कर्मचारी सचिन मुंडे, अशरफ शेख, ठाकरे, विजय नेरकर, जितेंद्र राजपुत यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावून मालासह ट्रक क्र (एम.एच.04.सीयू.208)(एमएच.04सी.यु.9860) या दोन ट्रक ताब्यात घेतले आहे. ट्रक वरील चालक तस्लीम खान अय्युबखान (रा.पाळधी.ता.धरणगाव) याला अटक करण्यात आली असुन फिरोज खान जाफरउल्ला खान (रा.गिट्टी खदान नागपुर) हा पसार झाला आहे. श्री.भगीरथ टेक्सटाईल लि.कोहळी (ता.कळमेश्वर. जि.नागपुर) कपंनीचे मॅनेजर प्रकाश भिमराव मंडलीक यांच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नागपुरच्या भगीरथ टेक्स्टाईल कंपनीने गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील विलायत इंडस्ट्रीज इस्टेट येथून मागवलेला सिन्थेटीक व्हिस्कोस स्टेपल फायबर 25 लाख 15 हजार 378 चा माल घेवून प्रित रोडवेज गुडस कॅरीअर ट्रान्सपोर्ट चा ट्रक क्र(सी.जी.04 जे.बी.1479) हा ट्रक 28 जुन 2017 रोजी संध्याकाळी पाच वाजता निघाला. तो, माल चार दिवसात अर्थात 1 जुलै रोजी नागपुर येथे पोचणे अपेक्षीत होते. मात्र 5 जुलै उलटूनही ट्रक पोचला नाही, म्हणुन चौकशी सुरू झाली. प्रित ट्रान्सपोर्टचे मालक सोबत घेत कंपनी मॅनेजर चालक, कपंनीचे कर्मचारी असे गाडीच्या शोधार्थ 16 जुलै पासून निघाले होते.