ट्रक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

0

जळगाव: बुधवारी दुपारी सलमान खान इब्राहीम खान पठाव व रूखसारबी मर्द जाहीद खान हे दुचाकी क्रं.एमएच.19.ए.टी.3986 ने म्हसावदकडून बोरनार येथे जात होते. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर क्रं. एमएच.19.एएन.2713 वरील चालक रामदास भिल याने भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून सलमान खान यांच्या दुचाकीला धडक दिली.

यात सलमान व रूखसारबी ह्या गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गुरूवारी सलमान यांच्या जबाबावरून ट्रॅक्टरचालकाविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.