हिंगोली : हिंगोली-वाशिम रोड वर ट्रक आणि महिंद्रा जीपच्या झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जीप वाशिमहून हिंगोलीकडे येत होती. अन्नपूर्णा शाळेजवळ या जीपची ट्रकला जोरदार धडक झाली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दोघा जखमींना अधिक उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे.
वाहतूक ठप्प , चालक फरार
या दुर्घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय. हिंगोली-वाशिम या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या खूप आहे. पण अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातातील वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.