ट्रक आदळून सुमोसह पुलाखाली; 4 ठार

0

धुळे। शहरातील मुख्य बाजारपेठ पाच कंदील परिसरातील आगीची घटना ताजी असतानाच तालुक्यातील मुकटी येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या ट्रक आणि सुमोमधील भीषण अपघातात चार जण ठार झाले. मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे. सुरतकडून पारोळा जाणारी सुमो आणि जळगावहून धुळ्याकडे येणार्‍या ट्रकच्या भीषण अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

मुकटी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेजवळ पुल असून त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. ते वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक सुमोवर आदळला आणि ही दोन्ही वाहने 50 फुट पुलाच्या खाली कोसळली. सुमोमध्ये मुस्लिम समाजातील 11 जणांचा समावेश होता. ते पारोळ्याला नातेवाईकांकडे जात होते. अपघातानंतर मुकटी ग्रामस्थांनी जखमींना ग्रामीण रूग्णालयात नेले. नंतर पोलिसांसह अन्य यंत्रणा कामाला लागली. वर्षभरापासून मागणीकडे दुर्लक्ष अपघातात फरजाना बानो सिदी (वय 22), सुमय्या इब्राहीम सिदी (वय 12), फरहद इसा सिदी (वय 6) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शहाजा बानो सिदी (वय 24) यांची उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना जिल्हा शासकिय रूग्णालयात नेण्यात आले. खड्ंड्याच्या मुद्द्यावरून मुकटीच्या संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. यामुळे दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. वर्षभरापासून खड्डे बुजवावे अशी वेळोवेळी मागणी केली. त्यामुळे जबाबदार अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही; अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दोन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांसमक्ष आजच खड्डे बुजविण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वेळीच खड्डे बुजविले गेले असत तर निष्पापांचा बळी गेला नसता अशी संतप्त प्रतिक्रीया युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंखे यांनी दिली. सिद्धी कुंटूबीय जळगाव येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुमो (क्र- जी जे 07 आर 6980)ने जात होते. रस्त्यात मुकटी गावाजवळ समोरून येणार्‍या भरधाव ट्रक (क्र. एम एच 04 एफ पी 0556)ने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. जखमींमध्ये मोहंमद सिध्दीक चांद मोहंमद सिध्दी 27, जोयाफतिमा मोहंमद सिध्दीक सिद्धी 4, जैद सिध्दीक सिध्दी 2, करीमाबीबी अली मोहंमद मकवा सिध्दी 46, फरताना ईब्राहिम मकवा सिद्धी 30, चालक ईसाक सालम मकवा सिध्दी 55, अनस ईसाक मकवा 2, ईसाक अखतर हुसेन मकवा 17, ईब्राहिम युसूफ मकवा 34 (सर्व रा. खानसाहेबानो भारा,वरीयावी बाजार,धास्तीपुरा सुरत) यांचा समावेश आहे.