ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार

0

एक जण जखमी; डुकरझिरे गावाजवळील घटना

साक्री  । तालुक्यातील दहिवेल गावापासून जवळच असलेल्या डुकरझिरे गावाजवळ महामार्गावर ट्रक उलटल्याने त्यातील लोखंडी पाईपाखाली दाबले जाऊन तीन जणांचा जागीच अंत झाला तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री ७.३० वाजेच्यासुमारास घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी पाईप घेऊन जीजे १२ बीव्ही ६१८३ क्रमांकाचा १२ चाकी ट्राला दहिवेलकडून धुळ्याकडे जात होता. तो महामार्गावर डुकरझिरे गावाजवळ अचानक उलटला. ट्रालावरील लोखंडी पाईप खाली पडले. त्याखाली दाबले जाऊन ट्रालाच्या बाजुने चालणारे अर्जुन अशोक सोनवणे (१८), विनोद मालते (३०), उगलाल गायकवाड (३५) सर्व मालणेगाव या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दादाजी विश्वास भील मालणगाव हे जबर जखमी झाले आहेत.

वाहतुकीची कोंडी
या चार जणांपैकी दोन जण या मोटारसायकलवर जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली पाईपखाली दबल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली होती. दुचाकीही दाबली गेली होती रस्त्यावर आलेले पाईप आणि पलटी झालेला ट्रक यामुळे महामार्गावर कोंडी झाली होती.