ट्रक क्रुझर अपघातात चार जण जखमी

0

धुळे । मुबई -आग्रा महामार्गावरील महामार्गावरील हॉटेल नालंदाजवळ सोमवारी रात्री 11 वाजता ट्रक आणि कु्रझर यामध्ये अपघात झाला. यात चार जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. एमपी 09 एफए 5697 क्रमांकाची कु्रझर मुंबईकडून मध्यप्रदेशाकडे जात असताना मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल नालंदाजवळ समोरुन येणारा एमएच 18 एम 1419 क्रमांकाचा ट्रक समोरुन येत होता. या दोघांमध्ये सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला. कु्रझरच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात राजू सत्तेलाल बागडी (30), चेतन नेमीचंद चोरडीया (23), बाळू गंगाराम वरोद (50), विजय रामदयाल पटेल (55) सर्व रा. मध्यप्रदेश हे गभीर जखमी झाले. यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास अनिल बाबुलाल वाडीया यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.