ट्रक क्लिनर तांबापूरातून बेपत्ता

0

जळगाव । ट्रान्सपोर्ट कंपनी काम करणार्‍या 33 वर्षीय तरूण बाहेरून फिरून येत असल्याचे सांगत घरातून निघून गेला. मात्र अद्यापपर्यंत घरी परतला नसल्याने एमआयडीसी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, नंदीगाना श्रीनिवास (वय-33) हा रा. कार्टून रोड ता.वयूर जिल्हा कृष्णा आंध्रप्रदेश हा जळगाव ट्रान्सपोर्ट कंपनीत क्लिनर म्हणून काम पाहतो. मुस्लिम खान फकिर खान यांनी मी बाहेरून फिरून येतो असे सांगून 11 एप्रिल रोजी सायंकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली असता मिळून आला नसल्याने मुस्लिम खान फकिर खान यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास स.फौ.भगीरथ नन्नवरे करीत आहे.