ट्रक चालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

जळगाव । कालिंका माता चौकाजवळ 8 मार्च रोजी सायंकाळी झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात युवक ठार झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी ट्रक चालकाला अटक करून न्या. एस. जे. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आयोध्यानगरातील प्रफुल्ल ऊर्फ सनी बळीराम खरोटे 8 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दुचाकीने आयोध्यानगराकडून कालिंका माता चौकाकडे येत होता. त्याचवेळी ट्रक (एम.एच. 18 एम 5701) महामार्गावरुनच कालिंकामाता चौफुलीकडे वळण घेत होता. ट्रक अचानक वळाल्याने अयोध्यानगरकडून येणार्‍या सनी खरोटेची दुचाकी (एम.एच. 19 बीबी 2593) ट्रकवर जोरात धडकली होती. या अपघातात सनी ठार झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ट्रक चालक किरण कारभारी देसले याला मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.