ट्रक-टँकर धडकेत दोघे गंभीर जखमी

0

देहूरोड : चौकामध्ये अचानक आडव्या आलेल्या ट्रकला टँकर धडकला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात देहूरोड येथील सेंट्रल चौकात गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास एक टँकर (एम एच 12 / के पी 8006) पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. देहूरोड मधील सेंट्रल चौकाजवळ टँकर आला असता अचानक चौकात दुसरा ट्रक घुसला. अचानक समोर आलेल्या ट्रकमुळे टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर समोरच्या ट्रकला मागच्या बाजूने धडकला. यामध्ये टँकरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक आणि क्लीनर दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अचानक आडवा आलेल्या ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून काढता पाय घेतला.