ट्रक टर्मिनलचे आरक्षण रद्द करा

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका हद्दीतील ट्रक टर्मिनलचे आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केलेली आहे. यासंदर्भात महापौर काळजे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.

नागरिकांच्या मागणीचा विचार व्हावा
मोशी येथील तापकीरनगर, साईकृपा कॉलनी, सहयोग कॉलनीतील क्रमांक 1, 2, 3 व 4 याठिकाणी नागरी वस्ती आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात सर्व्हे क्रमांक 452/1/1 असून, त्या जागेवर ट्रक टर्मिनलचे आरक्षण आहे. महापालिका हद्दीत मोशीचा समावेश झालेला आहे. या जागेच्या परिसरात ग्रामपंचायत कालावधीपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. त्या नागरिकांच्या मिळकतीही आहेत. त्या मिळकतींची नोंद महापालिकेकडे असून, तेथील रहिवाशी मिळकतकर भरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ट्रक टर्मिनलचे आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या मागणीचा विचार करून हे आरक्षण रद्द करावे, असे महापौर काळजे यांनी म्हटले आहे.