ट्रक-दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार

0

अडावद । ट्रकने दुचाकीस मागून दिलेल्या धडकेत एका शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना अपघात 25 रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावरील अडावद-लोणी दरम्यान घडली. खर्डी येथील शेतकरी नवाब गुलशेर तडवी (37) व हेमराज संतोष पाटील (36) हे आज मक्याचे पेमेंट घेण्यासाठी दुचाकीने (एमएच 19- सीपी 2739) अडावदला जात होते.

लोणी गावानजीक मागून येणा:या ट्रकने (एमएच18- एम 4410) दुचाकीस जोरदार धडक देवून जवळपास 50 ते 60 फूट फरफटत नेले. यामुळे दुचाकीच्या पेट्रोल टाकीतून पेट्रोलची गळती सुरू झाली. घर्षणामुळे स्पार्किग होत टाकीचा स्फोट झाला. यात दुचाकी अर्धीपेक्षा जास्त जळाली. दुचाकीवरील नवाब तडवी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर हेमराज पाटील हे जबर जखमी झाले. हेमराज पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय श्री निकम नवाब तडवी यांच्या पश्चात पत्नी तीन मुली, दोन मुले आहेत.