शिरपूर । शिरपूर तालुका ट्रक-मालक युनियनतर्फे गुरुवार दि. 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजता सी.आर. पेट्रोल पंप, शिरपूर फाटा येथे फलक अनावरण, दिनदर्शिका व कार्यालय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिरपूर तालुका ट्रक-मालक युनियनच्या फलकाचे उद्घाटन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते तसेच कार्यालयाचे उद्घाटन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते व दिनदर्शिकेचे प्रकाशन धुळे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय लांडे यांच्या हस्ते करण्यात येईल. तहसिलदार महेश शेलार यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.