ट्रक-मोटरसायकल अपघातात एक ठार

0

सोनगीर । येथे मुंबई-आग्रा महामार्गांवर देवभाणे फाटाजवळील हॉटेल ज्योती समोर मोटरसायकलला ट्रकने दुपारी 3.30 वाजता जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सोनगिर पोलीसात गुन्हा दाखल
मयत सुधाकर थोरात यांना सोनगीर पोलीसांनी ग्रामीण रूग्णालयात नेले. तर दाजभाऊ पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना 108 अ‍ॅम्बुलंसने धुळे येथे सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ट्रकचालकाविरोधात मयत सुधाकर थोरात यांचा मुलगा राहुल थोरात यांच्या तक्रारीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शासकीय कामासाठी जात होते
पोलीसांत दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे पंचायत समितीचे उप अभियंता सुधाकर त्र्यंबक थोरात हे शासकीय कामांसाठी कापडणे येथे गेले होते. कापडणे येथून ते ठेकेदाराची मोटरसायकल (क्र. एमएच 18 एजी 8265) ने चिंचखेडा येथील दाजभाऊ नथ्थु पाटील यांना सोबत घेवून जेवणासाठी जात होते. त्याचवेळी धुळ्याकडून भरधाव वेगाने येणारी मालट्रक (क्र. जीजे 3 एटी 1002) ने त्यांच्या मोटरसायकला देवभाणे फाटा येथे ट्रकने जोरदार धडक दिली. यात सुधाकर थोरात हे जागीच ठार झालेत. तर दाजभाऊ पाटील हे जखमी झालेत.