अर्थे गावाजवळ अपघात ; वाघाडी गावावर शोककळा
शिरपूर । शिरपूर तालुक्यातील अर्थे गावाजवळ 5 रोजी सकाळी 8.30 वाजता समोरुन भरधाव वेगात येणार्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली. यातील एक मयत हा तालुक्यातील वाघाडी येथील तर एक शहादा येथील असुन जवळचे नातेवाईक आहेत. तालुक्यातील वाघाडी येथून शहादा जाण्यासाठी तेथील मनोज वसंतराव देवरे (माळी) (वय-28) व दर्शन रामचंद्र महाजन (वय 11) हे जात असतांना हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.