ट्रकसह चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
नवापुर । रायंगण गावाच्या शिवरात सुरत नागपुर हायवे नं. ६ येथे सकाळी ६.३० वाजता ट्रक व रिक्षा यात भिषण धडक होवून एक ठार व एक जखमी झाल्याची घटना घडली. ओम साई हॉटेलजळव नवापुरहून विसवाडी येथे दूध घेण्यासाठी जात असलेली रिक्षा क्र. जी. जे. १९ यु ६०३२ जात असतांना समोरून येणार्या मालट्रक क्र. १८ एम ९३१ यावरील चालकाने जबर ठोस दिल्याने अपघात झाला. या अपघातात रिक्षात रिक्षाचालक व दूध व्यवसायिक जखमी झाले. यात दूध व्यवसासायिक नवापूर येथील शास्त्रीनगरचे रहिवाशी पंकज पाटील यांना जिल्हा रूग्णांलयात नेत असतांना पाटील यांचे रस्त्यांतच निधन झाले. तर रिक्षा चालक गोहील याला गुजराथ राज्यातील व्यारा येथे पाठविण्यात आले आहे.
शास्त्रीनगर भागातील चौथी घटना
ट्रकसह चालकला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. गुमान पाडवी करीत आहे. मयत पंकज हा सुशिक्षित मुलगा होता पुर्ण दिवस काम करुन तो आपल्या परिवाराला हातभार लावत होता. रोज काम करण्यातच तो मग्न असायचा. तरुण मयत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे . तरुण मयत होण्याची शास्त्रीनगर भागातली ही चौथी घटना आहे.