यावल : दोन ट्रकची समोरासमोर धडक होवून दोन जण गंभीर जखमी झाले. वाघोदा गावाजवळ रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात इतका भीषण होता की जखमींना वाहनातून बाहेर काढण्यास तब्बल अर्धातास लागला. जेसीबीच्या सह्याने ट्रक वेगळे करुन जखमींना बाहेर काढण्यात आले. रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर वाघोदा गावाजवळ चोपड्याकडील वळण रस्त्यावर यावलकडून चोपड्याकडे जाणारा ट्रक (सी.जी.04 जे.डी.5795) चोपड्याकडून यावलकडे येणार्या ट्रकवर (एम.एच.11 एम.4039)आदळला.