अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांचा उद्यापासून भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्याहस्ते होणार होते. मात्र आज एक धक्कादायक घटना घडली. या स्टेडिअममध्ये ज्या गेटमधून ट्रम्प जाणार होते ते तात्पुरते उभारलेले गेटच कोसळले आहे. यामुळे ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सीआयए सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता आहे.
अहमदाबादमधील या मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोटेरा स्टेडिअमच्या बाहेर उभ्या केलेल्या तात्पुरत्या गेटमधून आत जाणार होते. हे गेटच शनिवारी कोसळले. या गेटच्या आसपास कोणीही नसल्याने दुर्घटना टळली आहे. दौऱ्याच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने चौकशी सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीअमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेव्हा टेक्सास येथे ह्यहाउडी मोदीह्ण हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच धर्तीवर हाउडी ट्रम्प हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. जगातील या दोन बड्या नेत्यांच्या हस्ते या स्टेडियमच्या उद्घाटनाचा प्रस्ताव आहे.