अहमदाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवशीय भारत दौऱ्यावर आहेत. आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाले आहे. अहमदाबाद विमानतळावर ट्रम्प पत्नी आणि मुलीसह भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर मोठ्या दिमाखात ट्रम्प दांपत्याचे स्वागत केले. अहमदाबाद विमानतळावरून ट्रम्प यांचा ताफा साबरमतीला पोहोचला. साबरमतीलाही ट्रम्प यांच्या स्वगताची भव्य तयारी करण्यात आली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या आश्रमाला ट्रम्प यांनी भेट देऊन साबरमती आश्रम कुतुहलाने पहिले.
गुजरातपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होत असून त्यानंतर ते ताजमहलला भेट देणार आहे. नंतर दिल्लीला रवाना होणार आहे.