ट्रम्प यांचा सूर बदलला; म्हणाले, ‘मोदी इज ग्रेट’

0

कोरोना विरुध्दच्या लढाईवरुन भारतावर कौतुकाचा वर्षाव

वॉशिंग्टन : हायड्रोक्झीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या औषधाच्या पुरवठयावरुन जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत अचानक बदल झाला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी या औषधासंबंधी नरेंद्र मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तसेच करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक करत ‘मोदी इज ग्रेट’ असे म्हटले आहे.
फॉक्स न्यूजला दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, ‘मी लाखो डोस आणले आहेत. जवळपास २९ मिलियन डोस आपल्याकडे आहेत. पंतप्रधान मोदींशीही बोललो. बरेच डोस भारतातून येतील. ते आम्हाला देणार का हेही मी मोदींना विचारले. मोदी महान आहेत. त्यांनी अत्यंत चांगले उत्तर दिले. त्यांनी निर्यात बंदी लागू केली कारण हे औषध त्यांना भारतासाठी लागत होते, असे सांगतांना त्यांनी कोरोना विरुध्दच्या लढाईत मोदी सरकारच्या कामांचे कौतूक देखील केले.