नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या पत्नीसह भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातील कराराच्या दृष्टीने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात विविध संरक्षण करारांवर मोहोर उमटणार असले तरी व्यापार कराराबाबत अजूनही अमेरिकेशी एकमत होऊ शकलेले नाही. अमेरिकेनेच शेवटच्या क्षणाला या करारातून माघार घेतली. इंडिया टुडे या बद्दल वृत्त दिले आहे.
दोन्ही देशांमध्ये व्यापारावरुन मतभेद कायम आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्यात कुठल्याही व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या होणार नाहीत. भारतात येण्यापूर्वी ट्रम्प यांनी व्यापाराच्या मुद्दावरुन आपली नाराजीही प्रगट केली आहे. भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी भारत दौऱ्यापूर्वी दिली आहे.
भारतात मोठया प्रमाणावर कर आकारला जातो. त्यामुळे अमेरिकी कंपन्यांचे नुकसान होते असा ट्रम्प यांचा आक्षेप आहे तसेच अमेरिकन कंपन्यांना भारतीय बाजारपेठामध्ये जास्तीत जास्त प्रवेश देण्याच्या मुद्दावरुनही मतभेद आहेत.