पॅरिस- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या फ्रान्सच्या दौर्यावर आहेत. तिथे ट्रम्प एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी ब्रिजिट यांच्या फिगरचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभर जोरदार चर्चा सुरू आहे.
ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांच्या स्वगतासाठी इमॅन्युअल आणि ब्रिगिट्टी उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांनी ब्रिजिट यांच्या दोन्ही गालावर पॅरिस स्टाइल किस केले. बराच वेळ ते ब्रिजिट यांचा हात हातात घेऊन उभे होते. यावेळच्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी ब्रिजिट यांच्या सुडौल शरीराचं कौतुक केलं. तुमची फिगर किती चांगली आहे. सुंदर!, अशी शब्दांत स्तुती केली. ट्रम्प यांच्या या वक्तव्यनंतर ब्रिगिट्टी थोड्याशा खजील झाल्याचे पहायला मिळाले. ट्रम्प आणि ब्रिगिट्टी यांचा हा व्हिडिओ सध्या सोलम मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल 39 वर्षांचे आणि फर्स्ट लेडी 64 वर्षांची अशी अजब स्थिती आहे. इमॅन्युअल आणि ब्रिगिट्टी यांची प्रेमकथा विलक्षण आहे.