ट्रान्सफॉर्मरमधून गेले तीन महिने वीजचोरी

0

भोसरी : लांडेवाडी परिसरातील बाबर पेट्रोल पंपाजवळील ट्रान्सफॉर्मरमधून गेल्या तीन महिन्यांमध्ये 3 वेळा वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या मुळे शॉर्टसर्किट होऊन पंपालाही मोठा धोका निर्माण झाल्याने पंपाचे मालक बाबर यांनी भोसरी पोलिस ठाण्यामध्ये आणि महावितरणकडे याबाबत तक्रार केली आहे. पोलिस उपनिरिक्षक नम्रता डावरे, महावितरणचे रोहित डामसे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी पंपाजवळील गुर्‍हाळ व पंक्चर दुकानदाराने ही वीजचोरी केल्याचे लक्षात आले. अनधिकृत टपरीधारकांनी डीपीच्या झाकणाचे मूळ कुलूप बदलून स्वतःचे कुलूप लावल्याचेही निदर्शनास आले. मात्र, त्या दुकानदारांवर काहीही कारवाई करण्यात आली नाही.