ट्रायच्या जाचक नियमांविरोधात केबल चालकांचा मोर्चा

0

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन ; नवीन नियमामुळे बेरोजगारी वाढण्याची भीती

भुसावळ- बीसीएन केबल ऑपरेटर ग्रुपतर्फे ट्रायच्या नवीन नियमांविरोधात 19 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येवून निषेध नोंदवण्यात आला तसेच विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भुसावळसह यावल, मुक्ताईनगर तालुका तसेच वरणगाव फैजपूर सावदा व इतर परीसरातून मोठ्या संख्येने केबल ऑपरेटर या मोर्चात सहभागी झाले होते. बीसीएन केबल ऑपरेटर ग्रुपचे अध्यक्ष एमफसलीम यांनी उपजिल्हाधिकार्‍यांसोबत ट्रायच्या नवीन नियमांसंदर्भात चर्चा करून नवीन दर हे केबल ऑपरेटर तसेच ग्राहकांनादेखील परवडणारे नाहीत याबाबत सविस्तर चर्चा केली. हे नवीन नियम रद्द करावेत, अशी मागणी प्रसंगी करण्यात आली. याप्रसंगी समाधान महाजन, बामणोदचे विजय पाटील आदींनीही चर्चा केली.