नवी दिल्ली-लोकसभेत मुस्लिम महिलांच्या हक्काच्या रक्षणासाठी तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडण्यात आलेला आहे. आज यावर लोकसभेत चर्चा होणार आहे. सरकारने हे विधेयक संमत करण्यासाठी व्हीप जाहीर केला आहे. विधेयकाला संमती देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. विधेयक मंजुरीसाठी आज यावर मतदान होऊ शकते.
केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक मांडले आहे.
मुस्लिम महिलांच्या हक्काच्या संरक्षणासाठी हे विधेयक आहे. विधेयक संमत झाल्यास ट्रिपल तलाक देणाऱ्या पुरुषाला तुरुंगवास तसेच शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे.