मुक्ताईनगर:- तीन तलाक हा मुस्लिम महिलांसदर्भातील कायदा लोकसभेत घाईघाईने मंजूर करण्यात आला. या कायद्याबाबत बुद्धिवंतांशी सल्लामसलत केल्याशिवाय ही प्रक्रिया पार पडली परंतु 22 ऑगस्ट 2017 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या कायद्याच्या मसुद्याची गरज नव्हती.
या कायद्यातील मजकूर भारतीय घटनेच्या तसेच मुस्लिम स्त्रीयांच्या मुलांच्या विरोधी आहे. या कायद्याच्या समाज विरोधी असल्याने हा कायदा त्वरीत रद्द करावा या मागणीचे निवेदन मुक्ताईनगरातील मुस्लिम समाज बांधव शेख हकिम शेख मणियार, शेख कलीम शेख रसुल मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार निलेश पाटील यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी नजुमाबी शेख हकीम चौधरी, सजोदाबी शेख सलीम, शहनाज बी.शेख रफिख, समीराबी शेख अहमद, शबाना बी.शेख कलीम यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.