यावल– मुस्लीम पर्सनल लॉ व तीन तलाक बिलामध्ये हस्तक्षेप न करण्यासाठी यावल नगरपालिकेचे नगरसेवक शेख असलम शेख नबी यांनी दिल्ली येथे मंत्रालयात खासदार ए.टी.नाना पाटील यांना निवेदन दिले. लोकसभेत पारीत झालेल्या तीन तलाक विधेयकाला विरोध असून भारतीय संविधानाचे उल्लंघण करणारी व अल्पसंख्यांकांच्या हितासाठी ही बाब धोकेदायक आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार दिला असून मुस्लीम पर्सनल लॉ बिलामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये या आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मुस्लीम समाजाच्या भावना शासनाकडे पोहोचवाव्यात, अशी विनंतीही यावलचे नगरसेवक शेख असलम शेख नबी यांनी खासदार ए.टी.नाना पाटील यांच्याकडे केली.