भुसावळ :- ट्रीपल तलाख बिल रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी शहरातील मुस्लीम युवा, भुसावळ शहरातर्फे मंगळवारी दुपारी रजा टॉवरजवळील शाळा क्रमांक तीनपासून हजारो मुस्लीम महिलांच्या उपस्थित मूक मोर्चा काढण्यात आला. आम्ही शरीयत कायद्याला मानणारे आहोत, ट्रीपल तलाख बिल रद्द करावे, मृत्यू स्वीकारू परंतु इमानचा सौदा करणार नाही आदी आशयाच्या फलकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. आंबेडकर चौक, मॉडर्न रोड, गांधी चौक, सातारा पुलामार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोर्चा पोहोचला. प्रातिनिधीक शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्यांना देण्यात आले. सुमारे 15 हजारांवर मुस्लीम महिलांनी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर अतिशय शिस्तबद्धपणे महिलांनी सुमारे अर्धा तास प्रांत कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.