भुसावळ : ट्रीपल तलाख देणार्या पतीसह सात सासरच्यांविरूध्द भुसावळातील बाजारपेठ पोलिसात पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुल होत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी छळ केला तसेच पतीने तीन वेळा तोडी तलाक, तलाक, तलाक म्हणून तलाक दिल्याने महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीसह इतरांविरुद्ध विनयभंग, हुंडा प्रतिबंधक कलम व मुस्लीम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण कायदा 2019 चे कलम 4 नुसार येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे 1.39 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन तलाकचा हा शहरातील पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे.
कोर्या मुद्रांकाच्या स्टॅम्पवर विवाहितेच्या घेतल्या सह्या
शहरातील एका भागातील कुटुंबातील महिलेस 10 मार्च 2019 ते 10 एप्रिल 21 या काळात त्रास देण्यात आला तसेच अन्य आरोपींनी त्रास दिल्याचा आरोप आहे. सुखाने नांदण्यासाठी सर्व सहन करावे लागेल, असे घरातील ज्येष्ठ मंडळी सुध्दा म्हणत होती. महिला फिर्यादी व तिच्या पतीला वेगवेगळ्या खोलीत ठेवण्यात आले तसेच पतीला भेटू देण्यात आले नाही. तसेच आपसात बोलू देत नव्हते. विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. 10 एप्रिलला फिर्यादीच्या सासरी बहूसंख्य नातेवाईकांना सकाळी 11.30 वाजता बोलावण्यात आले व सर्व जमा झाल्यावर त्यावेळी फिर्यादी महिलेची आई, काका यांनाही बोलावण्यात आले. यावेळी पतीने सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून सर्वा समोर पत्नीस मैने तुझे तलाक दिया, आम्ही तुला मुस्लीम धर्म रिती रिवजाप्रमाणे तलाक दिला आहे. असे म्हणत कोर्या मुद्रांकावर स्टॅम्पवर विवाहीतेच्या सह्या घेतल्या. यावेळी महिलेचा भाचा विवाहितेचे फोटो समाजात दाखवून तुझी बदमानी करेल, अशी धमकी दिली. तुझ्या भावांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. वडीलांकडून 25 हजार रूपये मागून घे असे म्हणत छळ केला. या कारणावरून विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीवरून येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहायक अधीक्षक अर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील पुढील करीत आहे.