भुसावळ । विभागातील ट्रॅकमनच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन विभागिय रेल्वे व्यवस्थापक आर.के. यादव यांनी सांगितले. ते 23 रोजी रेल कर्मचारी ट्रॅकमेन्टेनर असोसिएशनतर्फे आयोजित छोटेखानी स्वागत समारंभात बोलत होते. यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष नितेश बलखंडे, विभागिय सचिव रामाशंकर प्रसाद, उपाध्यक्ष प्रकाश जाधव, कोषाध्यक्ष मुकेश वर्मा, रामजीवन, गणेश, राजेंद्र लाटकर, नितीन सोनार, दीपक यादव, मनीष कदम, अर्चना पाटील, पूजा भालेकर, प्रियंका पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत समारंभानंतर संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. त्यात रेल्वेत कठीण कष्टाचे कार्य करुन दुर्लक्षित ट्रॅकमनला पदोन्नतीच्या सर्व विभागिय परीक्षांमध्ये संधी मिळावी, 30 टक्के रिस्क अलाऊंस मिळावा, कामाचे तास 12 तासावरुन 8 तास करावे, रात्र गस्तीसाठी एक ऐवजी 2 गँग कराव्या, अधिकार्यांकडून सन्मानजनक वागणूक मिळावी आदी मागण्यांसाठी भविष्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी, वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय), वरिष्ठ विभागिय सुरक्षा आयुक्त आदींना नूतन कार्यकारिणीची यादी सोपविण्यात आली.