ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरूणी बचावली

0

जळगाव – जळगाव शहरातील न्यायालय चौक ते गणेश कॉलनी रोडवर सुसाट वेगात येणाऱ्या ट्रॅक्‍टर चालकाने दुचाकीला धडक दिल्याची घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणी बालंबाल बाचावली असून तीच्या वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे. घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार व्हेस्पा दुचाकी क्र (एमएच 19 बीपी 5541)वरील विद्यार्थीनी रोज गार्डन कडून येवून नुतन मराठा महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर आली असतांना. मागून न्यायालय चौकातून सुसाट वेगात येणाऱ्या ट्रॅक्‍टर क्र.(एमएच 25 एन 583) वरील चालकाने दुचाकीला धडक दिल्याने विद्यार्थीनी वाहनासह मागील चाकात आली. सुदैवाने या अपघातातून तरुणी बचालवली असून ट्रॅक्‍टर चालकाने चुक मान्य करुन नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवल्याने तक्रार न होता प्रकरण आपासंत मिटवण्यात आले.