ट्रॅक्टरच्या धडकेत सांगवीचा युवक जागीच ठार

0

यावल : भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने सांगवीचा युवक जागीच ठार झाल्याची तर सहकारी मित्र गंभीर जखमी घटना यावल-फैजपूर रस्त्यावरील सांगवी गावाजवळ रविवारी सायंकाळी घडली. राजू निजाम तडवी (23, रा.सांगवी बुद्रुक, ता.यावल) असे मयताच नाव आहे.

तडवी हे मित्र शरीफ संजय तडवी (20) यांच्यासोबत दुचाकी (एम.एच.19 सी.जी.0429) ने फैजपूरकडून सांगवी गावाकडे परतत असताना ऊस घेवून जात असलेला ट्रॅक्टर (एम.एच.19 ए.ट.9473) ने धडक दिली. त्यात तडवी यांचा जागीच मृत्यू झाला तर शरीफ तडवी यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. दिनेश देवराज यांनी प्राथमिक उपचार करून जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातस्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांनी पथकासह धाव घेत पंचनामा केला व अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेतले. गुलशेर सुमान तडवी (रा.सांगवी बुद्रुक) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.