ट्रॅक्टरमध्ये मुरूम भरण्याच्या कारणावरून एकास मारहाण

चाळीसगाव : तांबोळे ते चितेगाव दरम्यान येथे ट्रॅक्टरमध्ये मुरूम भरण्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसात गुन्हा दाखल
नंदलाल रामेश्वर कुमावत (35, रा.तांबोळे बुद्रुक, ता.चाळीसगाव) हा आपला कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवार, 13 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तांबोळे ते चितेगाव दरम्यान खारमाती येथे ट्रॅक्टरमध्ये मुरूम भरण्याच्या कारणावरून त्याच्या गावातील बबलू भगवान कुमावत (रा.तांबोळे बुद्रुक, ता.चाळीसगाव) याने हातातील काहीतरी वेगळ्या वस्तूने नंदलाल कुमावतच्या डोक्यात मारली. यामध्ये नंदलाल याला दुखापत झाली तसेच मारहाण करून शिवीगाळ केली तर जीवे ठार मारण्याची धमकी बबलू कुमावत याने दिली. संदर्भात नंदलाल कुमावत यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी बबलू भगवान कुमावत (रा.तांबोळे, ता.चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण संगेले करीत आहे.