ट्रॅक्टरवरुन पडल्याने मजुराचा मृत्यू

0
निमड्या शिवारातील घटना ; रावेर पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा
रावेर :- भरधाव ट्रॅक्टरमधून पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास गारखेडा ते मांजल रोडवर फॉरेस्ट कपार्टमेंट 56 मधील निमड्या शिवारात घडली. या अपघातात संजीव गणपत राठोड (35, पाल) या मजुराचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अनिल धनराज राठोड यांनी फिर्याद दिल्यावरून ट्रॅक्टर चालक गुलशेर गंभीर तडवी (पाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने ट्रॅक्टर (एम.एच.19 सी.वाय. 1053) भरधाव चालवल्याने उतारावर मजूर संजीव राठोड ट्रॅक्टरखाली फेकले खाली फेकले गेले व मयत झाले. तपास उपनिरीक्षक कैलास पाटील, हवालदार माधव पाटील, कॉन्स्टेबल नरेंद्र बाविस्कर करीत आहेत.