मुक्ताईनगर – तालुक्यातील जोंधनखेडा येथे ट्रॅक्टर मागे घेताना सरफराज अफसर तडवी हा युवक ट्रॅक्टरखाली दाबला जावून मृत झलाा होत. 2013 मध्ये ही घटना घडली होती तर या प्रकरणी प्रवीण अनंता पाटील विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल होता. मुक्ताईनगर न्यायालयात पाच वर्ष खटल्याचे कामकाज चालल्यानंतर न्या.एम.एस.सरदार यांनी दोषी चालकास सहा महिन्यांच्या सश्रम कारावासासह दोन हजार रुपये दंड सुनावला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता निलेश जाधव यांनी सहा साक्षीदार तपासून प्रभावी युक्तिवाद केला.