ट्रॅक्टर चोरटा तालुका पोलिसांच्या जाळ्यात
साकेगाव-जोगलखेडा रस्त्यावरून मध्यरात्री महागड्या पाच लाखांच्या ट्रॅक्टरची केली चोरी : गुन्हा दाखल होताच मिळाले ट्रॅक्टर
भुसावळ घरासमोर लावलेले पाच लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर लांबवल्याप्रकरणी भुसावळातील एकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून चोरी केलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.
घराबाहेरून लांबवले पाच लाखांचे ट्रॅक्टर
तक्रारदार बापू रामराव पाथरवट (आंबेडकर नगर, साकेगाव, ता.भुसावळ) यांनी साकेगाव-जोगलखेडा रस्त्यावर त्यांचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (एम.एच. सी.झेड.9205) उभे केले असता संशयीत आरोपी रामनाथ रामचंद्र कनोजिया (45, शनी मंदिर वॉर्ड, भुसावळ) याने 2 ते 3 जुलैच्या मध्यरात्री ते चोरून नेले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात पाथरवट यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी कनोजिया याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरी केलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.