रावेर: अहिरवाडी येथील रहिवासी असलेल्या ट्रॅक्टर चालकाचा भरधाव ट्रॅक्टर चालवून ट्राली उलटल्याने व त्याखाली आल्याने मृत्यू झाला. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महेंद्र ट्रॅक्टर शोरूम समोर ही घटना घडली. सुनील प्रभाकर पाटील (36) असे मयत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. रसलपूर येथील एका व्यक्तीचे साहित्य घेऊन पाटील हे ट्रॅक्टर (एम.एच.19 ए.ई.9112) घेऊन गेले परतीच्या प्रवासात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली व त्याखाली सुनील हे आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रावेर पोलिसात दिलीप हिरामण पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून मयताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.