ट्रॅक्टर दुचाकी धडकेत उमर्‍याचा दुचाकीस्वार ठार

0

मुक्ताईनगर- भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत उमर्‍याचा दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास कुर्‍हा-वढोदा रस्त्यावरील पारंबी फाट्याजवळील गजानन महाराज मंदिराजवळ घडली. या अपघातात अन्य तीन जणही जखमी झाले आहेत.

चिमुकलीसह महिला जखमी
सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास कमलसिंग मांगो राठोड (38) ह दुचाकी (एम.एच.19-5001) ने कुर्‍हा गावाकडून उमरा गावाकडे परतीच्या प्रवासात असताना समोरून आलेल्या ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.19 बी.ए.7148) वरील चालक सुशील संजय झाल्टेने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार कमलसिंग हा बाजूच्या पुलाच्या कठड्यावर आदळून फेकला जावून पुलाखाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला तर दुचाकीवर असलेल्या रेखाबाई संतोष राठोड (26) व त्यांच्या दोन्ही मुली आरुषी (7) आणि दिव्या (2.5 वर्ष) हे तीन जण गंभीर जखमी झाले. ट्रॅक्टर चालक सुशील झाल्टे यास अटक करण्यात आली असून ट्रॅक्टरदेखील जप्त करण्यात आले. तपास सहाय्यक फौजदार प्रमोद चौधरी करीत आहेत.