ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चिंचोलच्या तरुण शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील चिंचोल येथील तरुण शेतकर्‍याचा हतनुर धरणाच्या बॅक वॉटर मध्ये बुडून मृत्यु झाल्याची घटना सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली. सार , तालुक्यातील चिंचोल येथील अशिकेत अनिल चौधरी वय 28 हा तरुण शेतकरी दि 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास शेतकर्‍याचा सण बैलपोळ्याच्या मुहुर्तासाठी ट्रॅक्टर धुण्यासाठी हतनूर धरणाच्या बॅक वॉटर नदीपात्रात गेला असता अचानक त्याचा पाय घसरुन तो नदीपात्रात बुडला. बराच काळ तो न परतल्याने नातेवाईकांना तो नदी पात्रात पडल्याची शंका आली व पोहणार्‍या तरुणांनी त्याचा नदीपात्रात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. पुढे त्याचेवर उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . अशिकेत हा चिंचोल येथील डॉ अनिल चौधरी यांचा मुलगा होता. गेल्या चार महिन्यापुर्वीच त्याचे लग्न झाले होते. मनमिळाऊ स्वभावाच्या अशिकेत बाबतीत अचानक घडलेल्या घटनेने चिंचोल गावावर शोककळा पसरली.