ट्रॅक्टर पोटावरून गेल्याने सावखेड्याच्या इसमाचा मृत्यू

Death of Isma of Savkheda after being run over by tractor : Accident while repairing tractor जळगाव : ट्रॅक्टरचे चाक पोटावरून गेल्याने विजय भिका चौधरी (43, रा. सावखेडा, ता. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोटावरून गेले ट्रॅक्टरचे चाक
सावखेडा येथील विजय चौधरी हे मंगळवारी ट्रॅक्टर दुरुस्ती करीत असताना त्यांच्या पोटावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. यात चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बुधवारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.