सणसवाडी : ट्रॅन्टर इंडिया लिमिटेड डिंग्रजवाडी, ता. शिरूर येथील कंपनीतून गेल्या आठवड्यात शिक्रापूरमधील कामगारांना बेकायदेशीर पद्धतीने कमी केल्याबाबत राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. तसेच, बुधवार दि. 5 डिसेंबर रोजी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाची ट्रॅन्टर इंडिया लिमिटेड मधील कामगारांना कमी केल्याबाबत भविष्यातील संघटनेचा लढा अधिक तीव्र करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, कार्याध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, दत्ताजिराव येळवंडे यांच्यासह पदाधिकारी होते.
हे देखील वाचा
कंपनी कामगार लढ्यात सहभागी होणार…
सदर चर्चेमध्ये ट्रॅन्टर इंडिया एम्पलॉइज युनियनला एक मताने पाठींबा देण्यात आला. कामगार प्रश्नांबाबत व्यस्थापनाने योग्य निर्णय न घेतल्यास व लवकरच टॅ्रन्टर इंडिया एम्प्लॉईज युनियनचा लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने संघटनेच्या 157 विविध कामगार संघटना लढ्यामध्ये सक्रिय सामील होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी, कंपनी प्रवेशद्वारासमोर युनियन प्रतिनिधी व कामगारांनी कंपनी व्यवस्थापनांचा तीव्र निषेध नोंदविला.