सातारा । बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन महिलांना आणि दोन महाविद्यालयीन विद्यार्थांना खासगी आरामबसने धडक दिली. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थी आणि एक महिलाही गंभीर जखमी झाले आहेत. बसचालकाचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे समजते. पुणे-बंगळुरू महामार्गावर हा अपघात घडला. उंब्रज येथील बस स्थानकासमोर सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
एक विद्यार्थिनी जखमी
भागीर्थी आनंदा सोनावले (वय-57 रा. डेरवण ता. पाटण) असे अपघातात ठार झालेल्या माहिलेचे नाव आहे. तर रोहित प्रमोद रामुगडे (वय-17 रा.चोरे ता.कराड) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. मुंबईहून बेळगावकडे चालली होती. अपघातानंतर जमावाने ट्रॅव्हल्स चालकाला खाली खेचलं आणि त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती, की चालकाचा मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत.