धुळे । धावत्या ट्रॅव्हल्स बसमध्ये झोपलेल्या इंदौरच्या तरुणीची छेड काढीत तिचा विनयभंग करण्याचा धक्कादायकप्रकार मध्यरात्री मुंबई-आग्रा महामर्गावरील तापी पुलाच्या पुढे घडला. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात आज पहाटे पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन दुर्गेश लाखनसिंग यादव या प्रवासी तरुणाला अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील (एमपी 04 पीऐ 9090) या क्रमांकाची इंटरसिटी ट्रॅव्हल्स बस 16 जानेवारी रोजी मध्यरात्री धुळ्याकडून इंदौरच्या दिशेने जात असतांना मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर गावाच्या पुढे तापी नदीवरील पुल ओलांडून 10-15 कि.मी. अंतरावर गेलेली असतांना 1.30 वाजेच्या सुमारास या बसमध्ये प्रवास करणार्या 26 वर्षीय तरुणीची छेडखानी काढीत विनयभंग करण्यात आला. या बसमधील प्रवासी तरुण दुर्गेश लाखनसिंग यादव (रा.शिवपूरी निलगर, चौराया तहसिल शिवपूरी जि.शिवपुरी) याने झोपलेल्या त्या तरुणीच्या पायाला हात लावून उठवले आणि लज्जा उत्पन्ना होईल असे कृत्य करून तरूणीचा विनयभंग केला. याप्रकाराने घाबरलेल्या त्या तरुणीने आरडाओरड केली. तिच्यासह असलेल्या लोकांनी बस चालकास बस थांबवण्याचे सांगितले. यावेळी आरोपीने बसचे दार बंद करुन त्या तरुणीसह साक्षीदारांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. यानंतर पिडीत मुलीने नातेवाईकांसह सोनगीर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरुन सोनगीर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस पहाटे 5.39 वाजता अटक केली.