महाबळेश्वर: आर्थर सीटी पॉईंटवरून आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या दाम्पत्याला ट्रेकर्सने वाचला आहे. अगदी शेवटच्या क्षणी ट्रेकर्सने पकडल्याने त्यांचा जीव वाचला. पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे.
घरगुती वादविवादामुळे या दाम्पत्याने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. आत्महत्या करण्यासाठी आम्ही महाबळेश्वरला जात असल्याचे नातेवाईकांना सांगत या दाम्पत्याने घर सोडले होते. या धमकीनंतर घाबरलेल्या नातेवाईकांने महाबळेश्वर पोलिसांना फोन करुन या प्रकाराची माहिती देत दोघांना शोधण्याची विनंती केली.
पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपने आपल्या ट्रेकर्सला परिसरामधील विविध पॉईण्टवर पाठवले. त्यावेळी आर्थर सीटी पॉईण्टवर ट्रेकर्सला एक जोडपे दिसले. ट्रेकर्सने धावत जाऊन या दोघांनाही थांबवले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.