लखनऊ। ट्रेनमधून प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच रेल्वे पोलिसांपैकी एकावर धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून, पीडित महिला मेरठ येथे राहणारी असून ती लखनऊ-चंदिगड एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. रिकाम्या डब्ब्यात नेऊन बलात्कार केला तिने चंदपूर रेल्वेस्थानकावरून ट्रेन पकडली होती. पीडित महिला ज्या डब्ब्यामध्ये बसली होती. आरोपीसुद्धा तिथेच होता. तो जबरदस्तीने तिला रिकाम्या डब्ब्यात घेऊन गेला. तिथे त्याने बलात्कार केला, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.